लातूरमध्ये पावसाचा कहर, मांजरा नदीला आलेल्या पुरामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान

जोरदार झालेल्या पावसाने मांजरा नदीला पुर आला. मांजरा प्रकल्पातून पाण्याचा प्रवाह नदीपात्रात सोडण्यात आला. त्यामुळे शिरुर अनंतपाळ तालुक्यातील डोंगरगाव, उजेड परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. हजारो एकर वरील सोयाबीनचे नुकसान झाले आहे.

मागील दोन दिवसांत मांजरा प्रकल्प क्षेत्रात पण जोरदार पाऊस झाला. नदी दुथडी भरुन वाहत होती. प्रकल्पातील पाणी पण नदीपात्रात सोडण्यात आले. यामुळे विदुर अनंतपाळ तालुक्यातील 200 ते 250 हेक्टर पीक सोयाबीन पिकाचे नुकसान झालेले आहे. डोंगरगाव बॅरेजच्या खाली असणाऱ्या डोंगरगाव ते उजेड शिवारातील शेतकऱ्यांचे यामध्ये नुकसान झाले आहे. तसेच सोयाबीनच्या पिकास शेंगा लागलेल्या होत्या, या पाण्यामुळे सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याची प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे. अद्याप कृषी विभागाकडून किंवा महसूल विभागाकडून कुठल्याही पद्धतीची चौकशी अथवा पंचकमा करण्यात आलेला नाही. तात्काळ नुकसान झालेले पिकाचा पंचनामा करून आर्थिक सहाय्य शेतकऱ्यांना करावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे