कोथरुडजवळ हेलिकॉप्टर कोसळले; पायलट गंभीर, तिघे किरकोळ जखमी

मुंबईहून हैदराबादकडे निघालेले हेलिकॉप्टर खराब हवामानामुळे लॅण्ड करत असताना झाडावर आदळून कोसळल्याची घटना शनिवारी दुपारी कोथरूडजवळ पौडमधील कोंढावळे येथे  घडली. अपघातात एक पायलट गंभीर जखमी आहे,  इतर तिघे किरकोळ जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

संजय आनंद, एस.बी. राज (62, ठाणे), अमनदीप हरभजनसिंह खोकर (36, ठाणे), धिर भाटिया (मुंबई)  अशी जखमींची नावे आहेत. यातील पायलट संजय आनंद हे गंभीर जखमी आहेत. ग्लोबल हेक्ट्रा कंपनीचे हे हेलिकॉप्टर होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)