
अमली पदार्थ तस्करीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने आरोपीचा जामीन मंजूर केला आहे. अर्जदाराने गुन्हा केल्याचे सिद्ध करण्यासाठी पोलिसांनी ठोस व ग्राह्य पुरावे सादर करणे आवश्यक असल्याचे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने आरोपीची सुटका केली.
भरत सेनानी असे त्या आरोपीचे नाव असून जामिनासाठी त्याने हायकोर्टात ऍड. गणेश गुप्ता यांच्यामार्फत अर्ज दाखल केला होता. या अर्जावर न्यायमूर्ती शिवकुमार दिगे यांच्या एकलपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.

























































