चोरट्यांमुळे स्पेनमध्ये हायस्पीड ट्रेन सेवा ठप्प

आपल्याकडे केबल चोरीला जाणे, गटाराची झाकणे चोरीला जाणे असे प्रकार वरचेवर घडतात. त्यामुळे नाहक नागरिकांना त्रास होतो. मात्र असे प्रकार आपल्याच देशातच नव्हे तर युरोपियन राष्ट्रांमध्येही घडतात. हेच बघा ना स्पेन देशात रविवारी केबल चोरीला गेल्याने तिथल्या हायस्पीड ट्रेन्सला मोठा फटका बसला. सर्व ट्रेन उशिराने धावत होत्या. माद्रिद ते सेविलेदरम्यानच्या हायस्पीड लाईनच्या सिग्नलिंग सिस्टममध्ये वापरली जाणारी केबल चार ठिकाणी चोरीला गेली. त्यामुळे माद्रिद आणि एंडालुसियादरम्यानच्या सगळ्या ट्रेन थांबल्या. त्यामुळे वीकेंडचा मुहूर्त साधून फिरायला बाहेरगावी गेलेले सगळे लोक अडकून पडले. लोकांनी स्टेशनवर गर्दी करू नये म्हणून आवाहन करण्यात आले. गेल्याच आठवड्यात स्पेन आणि पोर्तुगालची बत्ती गुल झाली होती. पूर्ण ब्लॅक आऊट झाला होता. त्यामुळे सर्व हायस्पीड ट्रेन्स बंद पडल्या होत्या.