Himachal Pradesh News – रोहतांग खिंडीजवळ कार दरीत कोसळली, चौघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

हिमाचल प्रदेशात कुल्लू जिल्ह्यातील रोहतांग खिंडीजवळ मुसळधार पावसामुळे कार रस्त्यावरून घसरली. यानंतर कार राहिनालाजवळ डोंगरावरून थेट दरीत कोसळल्याने चौघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि बचाव पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले.

हिमाचलमध्ये सध्या पावसाचा हाहाःकार सुरू आहे. पावसामुळे भूस्खलन, पुराच्या घटना सुरू आहेत. यामुळे रस्त्यांवरूनही माती, पाणी वाहत असल्याने रस्ते निसरडे झाले आहेत. यामुळे हा अपघात घडला.

कारमध्ये पाच जण होते. कारमधील सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातातील मृत आणि जखमीची अद्याप ओळख पटलेली नाही.