Video Trend – नदीतून पाण्याऐवजी वाहतोय बर्फ

Viral Video Massive Ice Blocks Flow Like Water in Himachal’s Pangi Valley Watch

हिमालय आपल्या भव्य आणि नितांतसुंदर सौंदर्यासाठी ओळखला जातो. मात्र निसर्गाचे बदलणारे रौद्र रूप धडकी भरवते. अलीकडे हिमाचल प्रदेशात हवामान अचानक बदलल्यामुळे हिमालय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हिमाचल प्रदेशातील विविध जिह्यांमध्ये मागील आठवडाभरापासून सातत्याने जोरदार बर्फवृष्टी होत आहे. याचदरम्यान चंबा जिह्यातील पांगी
व्हॅलीमधील एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये डोंगरांच्या मधोमध एक प्रवाह वाहताना दिसतो, पण हा प्रवाह पाण्याचा नसून बर्फाचा आहे. वितळलेल्या बर्फाचे मोठमोठे तुकडे पाण्यासारखे वाहत जात असल्याचे दृश्य या व्हिडीओमध्ये दिसते. हा व्हिडीओ @nikhilsaini या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.

Viral Video: Massive Ice Blocks Flow Like Water in Himachal’s Pangi Valley | Watch

A shocking video from Himachal Pradesh’s Pangi Valley has gone viral, showing a river of ice flowing through the mountains instead of water. Watch the incredible footage of nature’s power amidst heavy snowfall in Chamba district.