ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी यांचा ऐतिहासिक विजय

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज हे सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान बनणारे पहिले ऑस्ट्रेलियन पंतप्रधान ठरले आहेत. सार्वत्रिक निवडणुकीत अल्बानीज यांनी ऐतिहासिक विजय मिळवला. त्यामुळे त्यांच्या दुसऱ्या इनिंगचा मार्ग मोकळा झाला आहे. 21 वर्षांमध्ये पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी सलग दुसऱ्यांदा निवडणूक जिंकली आहे. अंतिम जागांची मोजणी अद्याप प्रलंबित असली तरी सुरुवातीच्या निकालानुसार लेबर पार्टीचा विजय जवळपास निश्चित झाला आहे.

दुसरीकडे कंझर्व्हेटिव्ह लिबरल पक्षाचे नेते पिटर डटन यांनी पराभव स्वीकारला आणि त्यांनाही त्यांच्या जागेवर पराभवाचा सामना करावा लागला. डटन म्हणाले की, निवडणूक प्रचारात आम्ही चांगली कामगिरी करू शकलो नाही हे आज स्पष्ट झाले असून मी पराभवाची संपूर्ण जबाबदारी घेतो. मी पंतप्रधान अँथनी यांना पह्न करून त्यांच्या विजयाबद्दल अभिनंदन केले. लेबर पार्टीसाठी ही एक ऐतिहासिक संधी असून मी त्यांचा आदर करतो. पृथ्वीवरील सर्वोत्तम राष्ट्राची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल ऑस्ट्रेलियातील जनतेचे आभार, असे अँथनी यांनी म्हटले आहे.