
ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून हिंदुस्थानी सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करून चोख प्रत्युत्तर दिले आहे. यासोबतच पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या देशवासियांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दरम्यान, केंद्रीय गृह मंत्रालयाने सीमावर्ती राज्यांमध्ये हाय अलर्ट जारी केला आहे. यासोबतच निमलष्करी दलांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या आहेत.
हिंदुस्थानने पाकिस्तान आणि पीओकेवर इतका मोठा हल्ला केला आहे की, पाकिस्तान घाबरला आहे. जरी सध्या हिंदुस्थानच्या सैन्यावर थेट हल्ला करण्याचे धाडस त्यांच्याकडे नसले तरी, ते पाकिस्तानच्या सीमेवर असलेल्या राज्यांच्या सीमावर्ती भागात काही कारवाया करू शकतात. अशा परिस्थितीत गृहमंत्री अमित शहा यांनी या सर्व राज्यांमध्ये हाय अलर्ट जारी केला आहे. यातच निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. सैनिकांना रात्रभर सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सीमावर्ती भागात होणाऱ्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आदेश ही देण्यात आले आहेत.