
पूर्वी बँकांवर दरोडे किंवा कॅश व्हॅन लुटण्याचे प्रमाण फार मोठय़ा प्रमाणावर होते. पण आता चोरटय़ांनीही चोरीचे तंत्र बदलले असून आता थेट एटीएम मशीन्स चोरण्यास सुरुवात केली आहे. राज्याच्या विविध भागांत गेल्या चार वर्षांत तब्बल 691 एटीएम मशीन्स चोरल्याची गृह खात्याची धक्कादायक आकडेवारी आहे.
ग्राहकांना चांगल्या सोयी देण्यासाठी सर्वच बँकांनी एटीएम मशीन्स जागोजागी बसवली आहेत. त्यातील अनेक मशीन्स तुलनेत वर्दळ कमी असलेल्या ठिकाणी आहेत. लहान गाळ्यांमध्ये किंवा लहान जागेमध्ये ही मशीन्स बसवली जातात. या गाळ्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असतात, अलार्म असतो, पण सुरक्षा रक्षक नसतात. त्यामुळे ही मशीन्सच उचलून नेतात आणि मशीन्स फोडून आतील रोकड पळवली जाते. एटीएम मशीन्स ज्या ठिकाणी ठेवली असतात. त्यात सीसीटीव्ही असतो. चोरटे एक तर हेल्मेट घालून किंवा तोंडाला मास्क लावून आत प्रवेश करतात आणि सीसीटीव्ही पॅमेऱ्यावर रंगाचा फवारा (स्प्रे) मारतात. त्यामुळे चोरटय़ांचे चेहरे दिसत नाहीत.
निर्जनस्थळी एटीएम मशीन्स नको
एटीएम मशीन्स नेहमी मॉल, रुग्णालये, शैक्षणिक संस्था, क्रीडा संपुल अशा संस्थात्मक पॅम्पसमध्ये असावीत. पोर्टेबल एटीएम मशीन्स लावू नयेत अशी शिफारस गृह विभागाने केली आहे. एटीएम मशीन्स चोरल्यावर अन्यत्र नेऊन पह्डले जाते. त्यामुळे मशीन्सवर जीपीएस सिस्टम लावावी. त्यामुळे मशीन्सचा माग काढता येईल. एटीएम मशीन्स ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी छुपे सीसीटीव्ही पॅमेरे लावा आणि रिअल टाईम ऐकण्याची उपकरणे बसवावीत. रात्रीच्या वेळी एटीएम मशीन्समधली रोख रक्कम कमी करावी.
z एटीएम चोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन गृह विभागाने याबाबतचा सविस्तर अहवाल आणि शिफारशी राज्य सरकारला केल्या आहेत.
गुन्हे उघड होण्याचे प्रमाण कमीच
मागील चार वर्षात एटीएम चोरीचे 691 गुन्हे दाखल झाले आहेत, पण त्यातील फक्त 334 गुन्हे उघड झाले आहेत.
एटीएम चोरीच्या घटना
वर्ष दाखल गुन्हे उघड झालेले गुन्हे
2022 199 88
2023 187 86
2024 200 98
मेपर्यंत 105 62