
प्रवास करताना अनेकांना मळमळ किंवा उलटीला सामोरे जावे लागते. प्रवासाला निघण्यापूर्वी आणि प्रवासादरम्यान आल्याचे लहान तुकडे किंवा आल्याची कँडी चघळल्याने मळमळ कमी होते. प्रवासादरम्यान लिंबू पाणी किंवा लिंबू सरबत प्यायल्याने आराम मिळतो. वेलची खाणे फायदेशीर ठरते.
प्रवासात बडीशेपदेखील मळमळ कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. प्रवासादरम्यान बडीशेप चघळल्याने किंवा बडीशेपचे पाणी प्यायल्याने आराम मिळतो. प्रवासाला निघण्यापूर्वी हलके आणि सहज पचणारे अन्न खा. प्रवासात जास्त मसालेदार पदार्थ खाणे टाळल्यास फायदा होतो.

























































