हे करून पहा – मानेवर काळे डाग पडले तर…

अनेकांच्या मानेवर काळे डाग पडलेले दिसतात. चेहरा गोरा असला तरी मान मात्र काळी असते. मानेवरचे काळे डाग घालवण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत. सर्वात आधी दररोज अंघोळ करताना मान नियमितपणे घासा. साबण आणि पाण्याने मान स्वच्छ करा. कधी कधी स्क्रबचा वापर करा.

मानेवर काळे डाग पडू नये यासाठी घराबाहेर पडल्यानंतर मानेला जास्त वेळ सूर्यप्रकाशात ठेवू नका. टोमॅटोचा रस मानेला लावल्यास काळे डाग नाहीसे होतात. बदामाचे तेल मानेला लावल्यास डाग कमी होतात. मानेला सनस्क्रीन लावा. एलोवेरा जेल मानेवर नियमित लावल्यास फायदा होतो.