ऐनवेळी उपयोगी पडणारे साठवणीचे पदार्थ..

1) आलं लसणाची पेस्ट जास्त काळ टिकण्यासाठी ती बनवताना त्यात थोडं मीठ आणि तेल टाकून हवा बंद डब्यात फ्रिजमध्ये ठेवा.

2) वाटणाचा मसाला जास्त काळ टिकण्यासाठी तो नीट भाजून मगच वाटा आणि साठवणीच्या डब्यात वरून थोडं मीठ टाकून फ्रिजमध्ये ठेवा.

3) कोथिंबीर आणि हिरव्या पालेभाज्या जास्त काळ टिकण्यासाठी त्या नीट निवडून कापडात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवा.
साखरेत लवंग टाकल्यास तिला मुंग्या येत नाहीत.

4) मिरची जास्त काळ टिकण्यासाठी ती फ्रिजमध्ये ठेवण्यापूर्वी तिचे देठ काढून टाका.

5) सुकं खोबरं फ्रिजमध्ये अथवा तांदळाच्या डब्यात ठेवलं तर खराब होत नाही.

6) कडधान्य टिकण्यासाठी त्यांना तेल लावून कडक उन्हात सुकवून ठेवावे.

7) सुकामेवा टिकण्यासाठी तो थोडा भाजून बरणीत भरून ठेवावा.

8) दूध आणि दुधाचे पदार्थ खराब होऊ नये यासाठी फ्रिजच्या मागील भागात ठेवावे.

9) मासे अथवा चिकन फ्रिजरच्या तळाशी साठवून ठेवावे. ज्यामुळे फ्रिजला घाणेरडा वास येत नाही.

10) फ्रिजमध्ये बेरीज टिकवून ठेवण्यासाठी त्या व्हिनेगरमध्ये बुडवून ठेवाव्या.

11) पावसाळ्यात साठवणीचे पदार्थ खराब होऊ नयेत यासाठी उन्हाळ्यात ते कडक उन्हात गरम करा. पापड, कुरड्यांना      ऊन दाखवलं तर ते लवकर खराब होत नाहीत.