स्लीपर आणि हाफ पँट घातल्याने अभियंत्यांना हॉटेलमधून हाकलून दिलं

3900
AGENT JACKS BAR

सामना ऑनलाईन, पुणे

हॉटेलमध्ये कोणी,आणि कोणत्या पोशाखात यावं यावर बारीक लक्ष ठेवून असलेल्या हॉटेलचालकाने आयटी अभियंत्यांच्या एका ग्रुपला बाहेरचा रस्ता दाखवलाय. या अभियंत्यापैकी काहीजण स्लीपर आणि हाफ पँट घालून हॉटेलमध्ये आल्याने त्यांना बाहेर काढण्यात आले. या देशात कोण काय खातंय यावर लक्ष ठेवलं जातंय तर या हॉटेलात कोण काय कपडे घालतंय यावर लक्ष ठेवलं जात असल्याची जळजळीत टीका या हॉटेलवर केली जात आहे. पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावर असलेल्या एजंटस जॅक बार हॉटेलमध्ये हा प्रकार घडला आहे.

Aseem Tribhuvan

Agent jacks Bar , a restaurant denies entry for wearing slippers स्लिपर्स घातल्या म्हणून हॉटेल मध्ये प्रवेश नाकारला. होटेल – एजन्ट जॅक बार, आय सी सी टॉवर, बी विंग, सेनापती बापट रोड A complaint…

आयटी कंपनीत काम करणाऱ्या काही अभियंत्यांनी बापट रस्त्यावर असलेल्या आयसीसी टॉवर्समधल्या या हॉटेलमध्ये जेवायला जायचं ठरवलं. मंगळवारी सकाळी ११च्या सुमारास हे सगळे या हॉटेलात पोहोचले. तेव्हा त्यातील काहींच्या पोशाखावर आक्षेप नोंदवत हॉटेलचालकाने त्यांना बाहेर काढलं. ‘तुमचा पोशाख हा हॉटेलमधील कोणतीही सेवा घेण्यास योग्य नाही ‘ असं  अजहर नावाच्या हॉटेलच्या कर्मचाऱ्याने सांगितल्याचं या अभियंत्यांनी म्हटलं आहे. या हॉटेलविरोधात या तरुणांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. दाखल करण्यात आली असून संबंधित हॉटेल चालकांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या