डोंगराएवढं दुःख असताना, शुभेच्छा तरी कशा द्याव्यात; सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर रोहित पवार यांची प्रतिक्रिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डोंगराएवढं दुःख असताना, शुभेच्छा तरी कशा द्याव्यात, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर उपमुख्यमंत्रीपद रिक्त झालं होतं. यातच आज राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी आज शपथ घेतली. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर प्रतिक्रिया देताना X वर एक पोस्ट करत रोहित पवार असे म्हणाले आहेत.

X वर पोस्ट करत रोहित पवार म्हणाले आहेत की, “राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून मा. सुनेत्राकाकी यांनी शपथ घेतली, याचा आनंद आहे. खरं म्हणजे मा. अजितदादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही पण किमान सुनेत्राकाकींच्या रुपात तरी आम्ही तिथं अजितदादांना पाहू.. डोक्यावर डोंगराएवढं दुःख असताना आणि आम्ही सर्वजण शोकाकूल असताना त्यांना शुभेच्छा तरी कशा द्याव्यात, हे कळत नाही.”