
घरबसल्या पासपोर्टसाठी अर्ज करण्यासाठी Passport Seva या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. नवीन युजर रजिस्ट्रेशन करून स्वतःचा आयडी आणि पासवर्ड तयार करा.
लॉगइन करून ‘Apply for Fresh Passport / Re-issue of Passport’ या पर्यायावर क्लिक करा. अर्जात तुमचे नाव, पत्ता आणि जन्मतारीख अचूक भरा व अर्ज सबमिट करा.
‘View Saved/Submitted Applications’ मध्ये ऑनलाइन फी भरा. ‘Pay and Schedule Appointment’ वर क्लिक करून जवळच्या केंद्राची तारीख आणि वेळ निवडा.
अर्ज सबमिट केल्यावर मिळालेल्या पावतीची प्रिंट काढा.अपॉइंटमेंटच्या दिवशी आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्मदाखला यांसारख्या अत्यावश्यक कागदपत्रांसह केंद्रावर जा.
केंद्रावर बायोमेट्रिक्स आणि कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करा. यानंतर तुमच्या घरी पोलीस व्हेरिफिकेशन होईल आणि काही दिवसांनी पासपोर्ट पोस्टाने घरी येईल.































































