
महाराष्ट्र तुकडेबंदी कायद्यानुसार, प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी जमीन खरेदी करण्यासाठी शेतकऱ्याला आवश्यक कागदपत्रांसह थेट प्रांताधिकाऱयांकडे (SDO) अर्ज करावा लागतो.
कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत यासाठीची अधिकृत परवानगी दिली जाते. प्रांताधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय अशा कमी क्षेत्राची रजिस्ट्री होणार नाही.
बागायतीसाठी किमान 10 आणि जिरायतीसाठी किमान 20 गुंठे जमीन असणे बंधनकारक आहे. एखाद्याला 1-5 गुंठे जमीन घ्यायची असेल, तर विशेष परवानगी घ्यावी लागते.
अशा व्यवहारात जिल्हाधिकाऱयांची किंवा संबंधित प्राधिकाऱ्याची मंजुरी घ्यावी लागते. प्रांताधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय अशा कमी क्षेत्राची दस्तनोंदणी (रजिस्ट्री) होणार नाही.
त्यासाठी नोंदणीकृत खरेदीखत, अद्ययावत सातबारा उतारा व फेरफार पत्रमोजणी नकाशा (अचूक हद्द दर्शवणारा) आधार कार्ड व ओळखपत्र ही कागदपत्रे अत्यावश्यक आहेत.

























































