
एलपीजी ग्राहकांनी ई-केवायसी पूर्ण केली नाही तर गॅस बुकिंग प्रक्रिया केली जाणार नाही. कंपनी डिलिव्हरी रद्द करू शकते. त्यामुळे तुम्ही अडचणीत याल.
एवढेच नव्हे तर सबसिडी ट्रान्सफर करण्यातही अडचणी येतील. सबसिडीची रक्कम तुमच्या खात्यात येणार नाही. त्यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते.
ई-केवायसी प्रक्रिया एकदम सोपी आहे. तुम्ही ज्या गॅस कंपनीचे ग्राहक असाल त्या कंपनीचे मोबाईल ऍप किंवा उमंग ऍप डाउनलोड करावे लागेल.
ऍपवर लॉगीन करा. मोबाईल नंबरद्वारे ऍपमध्ये लॉगीन करावे. त्यानंतर ई-केवायसी किंवा ‘आधार प्रमाणीकरण’ पर्यायावर क्लिक करा.
आधार फेसआरडी ऍपवरून तुमचा चेहरा स्कॅन करून पडताळणी पूर्ण करा. दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही गॅस एजन्सीकडे जाऊनही केवायसी फॉर्म भरू शकता.
































































