
जुने दही न वापरताही दही लावता येते. त्यासाठी दूध उकळून कोमट होऊ द्या. त्यात दोन-तीन हिरव्या मिरच्या धुऊन देठासकट टाका. भांडे आठ-दहा तास झाकून ठेवा. मिरच्यांच्या सालीवर असलेले नैसर्गिक लॅक्टिक बॅक्टेरिया दुधाचे दही बनवतात.
दूध कोमट करा. त्यात एक-दोन टिस्पून लिंबाचा रस घालून हलके ढवळा. आठ-दहा तास झाकून ठेवा. यामुळे दूध किंचित आंबट होते व दह्यासारखी घट्ट रचना तयार होते. त्याची चव थोडीफार वेगळी असू शकते.































































