हिवाळ्यात घरच्या घरी हाॅटेलसारखी कांदा भजी करताना या टिप्स वापरा, वाचा

थंडीच्या सीझनमध्ये सूप किंवा भजी खावंसं वाटणं हे खूप स्वाभाविक आहे. परंतु घरी केलेली भजी मात्र हाॅटेलसारखी होत नाही. खेकडा भजी करताना, आपण कितीही काळजी घेतली तरी, घरची खेकडा भजी ही कुरकुरीत होत नाही. हाॅटेलसारखी आणि स्ट्रीट फूड सारखी कुरकुरीत खेकडा भजी करण्यासाठी फक्त हा एक पदार्थ पिठ कालवताना मिसळा. खेकडा भजी होईल मस्त कुरकुरीत आणि क्रंची…

 

नारळपाणी पिण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा

कांदा भजी रेसिपी

साहित्य-

5 ते 6 मोठे कांदे
1 कप बेसन कमी जास्त
1/4 कप तांदळाचे पिठ
2 टेबलस्पून तिखट
1/2 टीस्पून हळद
1/4 टीस्पून ओवा
1/2 कप कोथिंबीर चिरलेली
4-5 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
1 चिमूट खाण्याचा सोडा
आवश्यकतेनुसार पाणी
मीठ चवीनुसार
तेल तळण्यासाठी
1 टेबलस्पून गरम तेल पीठात घालायला
2 टी स्पून धणे (कुस्करुन घ्यावेत)

सौंदर्यासाठी भाताचा उपयोग कसा करायला हवा, वाचा

कृती-

कांदे सोलून घ्या व त्यांचे उभे पातळ, काप करा..चिरलेल्या कांद्याची प्रत्येक पात वेगळी करावी.

कांद्यांना नंतर मीठ, हळद, तिखट लावून किमान अर्धा ते पाऊण तास झाकुण ठेवावे.

मीठ लावल्याने कांद्याला पाणी सुटते.

कांद्याला पाणी सुटल्यानंतर यामध्ये बेसन, तांदळाचे पीठ, तिखट, मीठ, चिमूटभर सोडा, ओवा,गरम तेल घालून चांगले मिक्स करून घ्या.

खेकडा भजी करताना महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. यामध्ये शक्यतो पाणी घालू नका.

वजन कमी करण्यासाठी आहारामध्ये या डाळीचा समावेश करणे खूप गरजेचे

एखादा चमचा पाणी ठिक आहे, परंतु खेकडा भजीत तुम्ही पाणी घातले तर ती कुरकुरीत होणार नाहीत.

तेल गरम झाले की त्यात भिजवलेल्या पिठाचे छोटे छोटे मोकळे भजी सोडावीत. व चांगले खमंग, सोनेरी रंगावर तळून घ्यावीत.

खेकडा भजी करण्यासाठीच्या महत्त्वाच्या टिप्स

खेकडा भजी करताना कांदा जितका पातळ चिरता येईल तितका पातळ चिरावा. म्हणजे तळण्यासाठी फार वेळ लागणार नाही.

रोज रताळे का खायला हवे, जाणून घ्या त्याचे आरोग्यवर्धक फायदे

कांदा पातळ असेल तितकी भजी अधिक कुरकुरीत होईल.

कोणतीही भजी कुरकुरीत होण्यासाठी, तेल खूप कडकडीत नसावे. मध्यम आचेवर भजी तळल्याने, ती चविष्ट आणि कुरकुरीत होईल.

तुम्ही कोणतीही भजी करताना, त्यात किमान 2 ते  3 चमचे तांदळाचे पीठ घाला. तांदळाचे पीठ घातल्यामुळे भजी क्रिस्पी होतात.

भजी तळताना अनेकदा तेल फसफसते. तसेच तेल जास्त खेचले जाते. अशावेळी तेलात थोडे मीठ घालावे. त्यामुळे जास्त तेल शोषले जाणार नाही.