रसाळ, गोड कलिंगड निवडताना…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कलिंगड खरेदी करताना त्याच्या रंगाकडे बारीक लक्ष द्या. जर टरबुजाचा रंग बाहेरून गडद, काळपट हिरवा असेल आणि तो सगळीकडे एकसारखा असेल तर ते टरबूज गोड असण्याची शक्यता जास्त असते.

वजनदार कलिंगड निवडा.

ज्या टरबुजाचा देठ हिरवागार आहे ते टरबूज अजून पिकायचं आहे असे समजा. कारण पिकलेल्या टरबुजाचा देठ कोरडा, वाळलेला असतो. त्यात रसरशीतपणा नसतो. नैसर्गिकपणे पिकलेल्या टरबुजावर पिवळट डाग असतो.