हे करून पहा, उचकी कशी थांबवावी?

how-to-stop-hiccups-home-remedies-water-sugar

आपल्यापैकी प्रत्येकाला अधूनमधून उचकी लागते. काहींची लगेच थांबते तर काहींची थांबत नाही. लवकर थांबली नाही तर मग त्रास व्हायला लागतो. हा त्रास टाळायचा असेल तर घरच्या घरी काही उपाय करता येतात.

 उचकी लागल्यास पाणी प्या. हा परंपरागत उपाय आहे. अनेकदा तसे केल्याने उचकी थांबते. मध खाऊनही उचकी नियंत्रणात आणता येते.

 चिमूटभर साखर खाल्ली तरी काही वेळाने उचकी थांबते. साखर आणि मीठ पाण्यात टाकून ते प्यायल्यासदेखील उचकी थांबते.

 उचकी लागल्यावर लांब श्वास घ्या. काही वेळ श्वास रोखून धरा. असे केल्याने फुप्फुसात हवा भरून राहते आणि उचकी थांबते.

 काळय़ा मिरीचे दोन-तीन तुकडे आणि खडी साखर तोंडात ठेवून चघळा आणि त्याचा रस घ्या. त्यानंतर एक घोट पाणी घेतल्यास उचकी थांबते.