
बँक खाते उघडण्यापासून ते सरकारी योजनांचा लाभ घेण्यापर्यंत प्रत्येक कामासाठी आधार कार्ड अनिवार्य आहे. सर्व सेवांचा लाभ घेण्यासाठी मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे.
अनेकदा जुना नंबर बंद झाल्यामुळे किंवा नवीन नंबर घेतल्यामुळे लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. नवीन नंबर आधारमध्ये कसा अपडेट करावा हे समजत नाही.
आधार केंद्रावर तासन्तास रांगेत उभे राहणे टाळण्यासाठी सर्वात आधी UIDAI च्या अधिकृत MyAadhaar Portal वर जा आणि ‘Book an Appointment’ या पर्यायावर क्लिक करा.
जवळचा परिसर निवडून मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड टाकून OTP मिळवा. त्यानंतर ‘Aadhaar Update’ हा पर्याय निवडून तुमची सोयीची तारीख व वेळ बुक करा.
अपॉइंटमेंट नुसार केंद्रावर ‘आधार सुधारणा फॉर्म’मध्ये नवीन मोबाईल नंबर भरा. त्यानंतर बायोमेट्रिक पडताळणी होईल. या प्रक्रियेसाठी 50 रुपये शुल्क आकारले जाते.





























































