बॉसचे महिला कर्मचाऱ्यासोबत कामात ‘काम’, HSBCच्या बड्या अधिकाऱ्याची चौकशी सुरू

3723

जगप्रसिद्ध बँक HSBC च्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर लैंगिक शोषण आणि कार्यालयातील बाथरूममध्येच महिलेशी संबंध ठेवल्याचा आरोप आहे. दोन महिलांसोबत असलेले ‘काम’ काजाचे संबंध 48 वर्षांच्या या अधिकाऱ्याला महागात पडण्याची चिन्हे आहेत, कारण यातील एका महिलेने या अधिकाऱ्याला लवादासमोर खेचले असून त्याच्याविरोधात चौकशीला सुरुवात झाली आहे.

रॉबर्ट क्लेग असं या अधिकाऱ्याचे नाव आहे. त्याच्यावर आरोप आहे की त्याने एका सहकाऱ्यासोबत प्रेमसंबंध प्रस्थापित केले. या महिलेने हे संबंध तोडून टाकल्यानंतर तिला उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. महिलेने संबंध तोडल्याचा राग आल्याने रॉबर्टने तिला त्रास द्यायला सुरुवात केली होती.

रॉबर्टने  मेडेलिन लकमॅन आडनावाच्या एका महिलेशी शारीरिक संबंध ठेवले होते. रॉबर्टची चार मुलं आहेत, त्यांच्यावर या संबंधांचा वाईट परिणाम होईल हा विचार करून या महिलेने त्याच्यासोबतचे संबंध दोन महिन्यातच तोडून टाकले होते. यामुळे भडकलेल्या रॉबर्टने या महिलेवर कार्यालयात अश्लील शेरेबाजी करायला सुरुवात केली. तिच्यासोबत भेदभाव करायला सुरुवात केली आणि तिच्या बाजूने जात असताना नको त्या ठिकाणी स्पर्श करायलाही सुरुवात केली. याबाबत तक्रार केली असता तिला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं.

नोकरीवरून काढल्यानंतर लकमॅनला कळालं की रॉबर्टचं दुसऱ्या एका महिलेशी संबंध आहेत. यानंतर तिने स्ट्रॅटफोर्ट रोजगार लवादाकडे रॉबर्टविरोधात तक्रार केली. आपल्यासोबत लैंगिक भेदभाव केल्याचं तिचं म्हणणं आहे. रॉबर्ट आणि HSBC बँकेने या आरोपांचे खंडण केलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या