मुंबई विमानतळ की दादर रेल्वे स्टेशन? प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा प्रवाशांना त्रास

मुंबई विमानतळावर आज प्रवाशांची मोठी गर्दी पहायला मिळाली. विमातळ प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे प्रवाशांना त्रास झाला. त्यांनी सोशल मिडीयावर या गर्दीचे व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करून नाराी व्यक्त केली आहे.

अनंत चतुर्दशी निमित्त आज राज्यात सार्वजनिक सुट्टी आहे. त्यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी गर्दी पहायला मिळाली. विमानतळावर तपासणीसाठी मोठी गर्दी पहायला मिळाली. विमानतळ प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

अशा प्रकारे प्रवाशांना त्रास होण्याची ही पहिलीच वेळ नाही. दोन दिवसांपूर्वी अशाच प्रकारे प्रवाशांची गर्दी झाली होती. तेव्हाही प्रवाशांनी विमानतळ प्रशासनाला धारेवर धरले होते.

रविवारी मुंबईहून कतारसाठी निघालेली इंडिगो फ्लाईट तांत्रिक कारणामुळे वेळेत निघालीच नाही. प्रवाशांना बराच वेळ विमानतळावर ताटकळत रहावे लागले होते. तेव्हाही प्रवाशांचा पारा वाढला होता.