
सीरियातील शिया आणि सुन्नी वादात उडी घेत इस्रायलने आज सीरियात हल्ला केला. सीरियातील सुरक्षा दले स्वेदा येथे ड्यूज मिलिशिया आणि बेदोइन या जमातींमध्ये सुरू असलेला हिंसाचार थांबवण्याचा प्रयत्न करत असताना हा हल्ला करण्यात आला. हल्ल्यातील मृतांचा आकडा कळलेला नाही. मात्र, दोन दिवसांपासून सुरू असलेल्या गृहयुद्धात 100 नागरिक ठार झाल्याचे समजते.
स्वेदा प्रांत सीरियाच्या दक्षिणेकडे असून येथे गेल्या 13 वर्षांपासून अंतर्गत यादवी सुरू आहे. यात येथील परिसर अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे. इमारती, घरे जमीनदोस्त झाली आहेत, तर हिंसाचारात 100 जणांचा मृत्यू झाला. हा हिंसाचार असाच सुरू राहिला तर आणखी बळी जाण्याची भीती व्यक्त होत आहे.