गुंतवणुकीच्या नावाखाली पती-पत्नीला घातला सहा कोटींचा गंडा!

इलेक्ट्रॉनिक्स व्यवसायात गुंतवणूक करून जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखवित पती-पत्नीला तब्बल ६ कोटी ९ लाख ५७ हजार १०३ रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी फसवणूक करणाऱ्या रियाज गुलाम रब्बानी शेख (रा. प्लॉट नं.११, नॅशनल कॉलनी, मौलाना आझाद कॉलेजसमोर) व त्याचे सासरे अनीस रझी सय्यद या दोघांविरुद्ध सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

वाळूज येथील जामा मशीद परिसरात राहणारे सलमान लियाकतखाँ बाजार येथे एसएलपी पठाण यांची जुना असोसिएट्स नावाची फर्म आहे. या फर्मच्या माध्यमातून इन्कम टॅक्स रिटर्न्स, जीएसटी, एमसीए येथे व इतर टॅक्स संबंधित कामे करतात. याबरोबरच रिअल इस्टेटमध्ये काम करतो. त्याच्या पत्नीच्या नावानेदेखील इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी-विक्री व लेबर सप्लायचे काम करतो. या व्यवसायातून २०१५ मध्ये त्याची ओळख रियाज गुलाम रब्बानी शेख याच्यासोबत झाली होती. हा सध्या बडे नवाबबाडा, चेलीपुरा पोलीस चौकीच्या पाठीमागे राहतो. त्याने मार्च २०२० मध्ये सलमान पठाण याला घरी बोलावून त्याच्या पॅन इंडिया लेव्हल या इलेक्ट्रिॉनिक्स वस्तूंच्या व्यवसायाची माहिती दिली. त्यातून मोठ्या प्रमाणात नफा मिळू शकतो, असे आमिष दाखविले. त्यांच्यात ओळख व नेहमीच घरी येणे-जाणे असल्याने सलमान याने त्याच्यावर विश्वास ठेवून सुरुवातीला काही रक्कम गुंतवणूक केली. या गुंतवणुकीवर त्याने परतावाही दिला. त्यामुळे सलमानचा रियाज सय्यद याच्यावर विश्वास बसला होता.

एप्रिल २०२४ ते ऑक्टोबर २०२४ या काळात सलमान पठाण यांनी शेख रियाज याच्या सांगण्यावरून दोन कोटींची गुंतवणूक केली. तसेच जुलै २०२४ ते जुलै २०२४ या काळात विविध खात्यांतून तसेच रोखीने सलमान पठाण यांनी २ कोटी १५ लाख ५० हजार रुपये दिले. या गुंतवणुकीमधील १ कोटी १३ लाख १६ हजार ५०० रुपये शेख शेख रियाज याने पैसे देणे बंद केले. पैसे मिळत नसल्याकारणाने सलमान पठाण यांनी शेख रियाज याला त्याच्या सासऱ्याच्य घरी पैशांबाबत विचारणा केली असता, ‘काय करायचे ते कर! जेथे तक्रार करायची तेथे तक्रार कर!’ असे सांगत एकूण व्यवहारामध्ये ६ कोटी ९ लाख ५७हजार १०३ रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी सलमान पठाण यांच्या तक्रारीवरून गंडा घालणाऱ्या शेख रियाज आणि त्याचा सासरा सय्यद अनिस रझवी या दोघांविरोधात सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे यांच्याकडे देण्यात आला आहे.