चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून;आरोपीला अटक

चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा गळा आवळून खून करून स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना करवीर तालुक्यातील कणेरी येथे घडली आहे. याप्रकरणी गोकुळ शिरगाव पोलिसांनी पतीला अटक केली आहे. कोमल निशिकांत चव्हाण (वय 28, रा. एकता कॉलनी) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून, निशिकांत सुरेश चव्हाण (वय 32) याला अटक करण्यात आली आहे.

कणेरी येथील एकता कॉलनीमधील दीपक पवार यांच्या घरी निशिकांत चव्हाण हा पत्नी कोमल आणि दोन मुलांसह राहत होता. चारित्र्याच्या संशयावरून त्याचा पत्नीशी वारंवार वाद होत होता. बुधवारी मध्यरात्री पुन्हा त्यांच्यात वादावादी झाली. यावेळी रागाच्या भरात त्याने पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर स्वतः राहत्या घरी दोरीने गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोरी तुटल्याने तो बचावला. गोकुळ शिरगाव पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या