धनखड म्हणाले… दाढीवाल्यांची मला भीती वाटते!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगदीप धनखड यांनी अचानक उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर बरंच वादळ उठलं होतं. ते वादळ शांत होत नाही तोच धनखड यांच्या एका विधानाने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. ‘मला दाढीवाल्यांची खूप भीती वाटते,’ असे ते म्हणाले. त्यांचा रोख नेमका कोणाकडे होता, अशी चर्चा त्यावरून रंगली आहे. राजस्थान दौऱ्यात स्वागत होत असताना ‘बरं झालं तुम्ही दाढी ठेवली नाही,’ असे तेथील एका व्यक्तीला ते म्हणाले. दाढी पाहताच मला भीती वाटते. माझे ओएसडीही त्यांच्या दाढीने मला घाबरवतात, असे त्यांनी सांगितले.