हुकूमशाहीला विरोध! मी राजा नाही, राजा ही संकल्पना अमान्य; राहुल गांधी यांचा मोदींवर निशाणा

मी राजा नाही आणि मी या ‘राजा’ संकल्पनेच्याच विरोधात आहे असे विधान काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी केले आहे.

राहुल गांधी एका कार्यक्रमात भाषण देण्यासाठी उभे राहिले. तेव्हा कार्यकर्त्यांनी हमारा राज कैसा हो राहुल गांधी जैसा हो अशा घोषणा दिल्या तेव्हा राहुल गांधी म्हणाले की, मी राजा नाही, मला राजा बनायचं देखील नाही. मी या राजा संकल्पनेच्याच विरोध आहे असे म्हणत त्यांनी एक प्रकारे हुकुमशाहीला विरोध केला असे सांगितले जात आहे.