माझं डिमोशन केलं, पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोरच मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला स्पष्ट बोलले

माझं डिमोशन केलं असे विधान जम्मू कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केले. तसेच राज्यात झालेल्या विकासकामांसाठी अब्दुल्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज जम्मू कश्मीरमधील चिनाब नदीवर बांधलेल्या पुलाचे उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले की देवीच्या कृपेने मनोज सिन्हा यांचे प्रमोशन झाले, परंतु माझे डिमोशन झाले. मी आधी एका स्वायत्त राज्याचा मुख्यमंत्री होतो पण आता केंद्र शासित राज्याचा मुख्यमंत्री झालो आहे. असे असले तरी लवकरच पंतप्रधान मोदी जम्मू कश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच यावेळी अब्दुल्ला यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचीही आठवण काढली.