हवाई दलाच्या विमानाचे तलावात इमर्जन्सी लँडिंग

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये हवाई दलाच्या एका विमानाचे तलावात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. वैमानिकांचे प्रशिक्षण सुरू असताना हा प्रकार घडला. या विमानातील दोन्ही वैमानिक सुरक्षित आहेत. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात दिले आहेत. हिंदुस्थानी हवाई दलाने यासंदर्भात अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले आहे. ’अपघातग्रस्त विमानाने दुपारी सवाबाराच्या सुमारास हवाई दलाच्या बामरौली तळावरून सरावासाठी नियमित उड्डाण भरले. अचानक तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे विमान एका निर्जन भागात सुरक्षितपणे उतरवण्यात आले. यात कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झाली नाही.