ICC award- रोहितला एकदिवसीय सामन्यातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचा पुरस्कार

18404

आय.सी.सी ने 2019 या वर्षातील क्रिकेटपटूंच्या कामगिरीच्या आधारावर पुरस्कारांची घोषणा केली आहे. यामध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचाही प्रामुख्याने समावेश आहे. रोहितला एकदिवसीय सामन्यातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळणार आहे.

विराट कोहलीला क्रीडाभावना जपणारा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळणार आहे. स्टीव्ह स्मिथची हुर्र्यो उडवणाऱ्या क्रिकेटरसिकांना कोहलीने इशाऱ्यांनीच खडसावलं होतं. त्याच्या या कृतीसाठीच त्याला हा पुरस्कार देण्याचं ठरवण्यात आलं आहे.

इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सला सर गारफील्ड सोबर्स ट्रॉफीने गौरवण्यात येणार आहे. स्टोक्सची निवड ही सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून करण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज पॅट कमिन्स याला कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार देण्यात येणार आहे.

आयसीसीने सर्वोत्कृष्ट जागतिक कसोटी संघही निवडला असून यामध्ये हिंदुस्थानच्या दोन क्रिकेटपटूंचा समावेश आहे. या संघाचा कर्णधार म्हणून विराट कोहलीचीच निवड करण्यात आली असून त्याच्याशिवाय मयंक अगरवाल यालाही संघात स्थान देण्यात आले आहे.

आयसीसीने सर्वोत्कृष्ट एकदिवसीय संघही निवडला असून त्याचेही कर्णधारपद कोहलीकडेच सोपवण्यात आले आहे. त्याच्याशिवाय या संघामध्ये तब्बल 3 क्रिकेटपटूंचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या