आयसीसी महिला टी20 विश्वचषकाला सुरुवात झाली आहे. बांगलादेशमधील राजकीय अस्थिरतेमुळे विश्वचषकाचे आयोजन UAE मध्ये करण्यात आले आहे. टीम इंडियाच्या विश्वचषक मोहिमेला आजपासून सुरुवात होणार आहे.
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात टीम इंडिया युएईमध्ये दाखल झाली आहे. विश्वचषकावर हिंदुस्थानचे नाव कोरण्यासाठी टीम इंडियाचा संघ सज्ज झाला असून आज (04 ऑक्टोबर 2024) टीम इंडियाचा पहिला सामना न्युझीलंडविरद्ध होणार आहे. सायंकाळी 7.30 वाजता टीम इंडिया आणि न्युझीलंड यांच्यामध्ये सामन्याला सुरुवात होईल. टीम इंडियाचा समावेश ग्रुप A मध्ये करण्यात आला असून टीम इंडिया व्यतिरिक्त ग्रुप A मध्ये ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका या संघांचा समावेश आहे. तर ग्रुप B मध्ये इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, स्कॉटलंड आणि बांगलादेश याा संघांचा समावेश आहे.
टीम इंडियाचा दुसरा सामना पाकिस्ताविरुद्ध 6 ऑक्टोबरला दुपारी 3.30 वाजता होणार आहे. तर तिसरा सामना श्रीलंकाविरुद्ध 9 ऑक्टोबरला आणि चौथा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध 13 ऑक्टोबरला होणार आहे. दोन्ही सामने सायंकाळी 7.30 वाजता खेळवले जाणार आहेत.