आता चेहराच बनेल तुमचा आधार; फेस ऑथेंटिकेशनद्वारे ओळख पडताळली होणार

सध्या आधार कार्ड महत्त्वाचे कागदपत्र आहे. अनेक सेवांसाठी आधार कार्ड मागितले जाते. अशातच युआयडीएआय आता फेस ऑथेंटिकेशनची व्याप्ती झपाट्याने वाढवत आहे. फेस ऑथेंटिकेशनने आधार कार्ड किंवा अन्य कागदपत्रे दाखवण्याची आवश्यकता राहणार नाही. चेहरा प्रमाणीकरणातून ओळख होईल. ही प्रक्रिया जलद आणि सुरक्षित असेल.

फेस ऑथेंटिकेशनद्वारे ओळख पडताळली केली जाईल. जेणेकरून बँकिंग, प्रवास, आरोग्यसेवा आणि ई-कॉमर्स सारख्या सेवा ओळखपत्राचा पुरावा न दाखवता मिळू शकेल. पूर्वी आधार प्रमाणीकरण फक्त सरकारी सेवांपुरते मर्यादित होते. परंतु आता ही सुविधा खासगी कंपन्यांनाही देण्यात आली आहे.

आता प्रवास, हॉटेल बुकिंग, आरोग्यसेवा आणि बँकिंग यासारख्या सेवांचा लाभ घेण्यासाठी ओळखपत्राची आवश्यकता नाही. फक्त कॅमेर्‍यासमोर तुमचा चेहरा दाखवल्याने, प्रमाणीकरण पूर्ण होईल आणि सेवा त्वरित उपलब्ध होईल.

आता खाजगी कंपन्यादेखील आधार पडताळणी करू शकणार आहेत. जेणेकरून बँकिंग, प्रवास, आरोग्यसेवा आणि ई-कॉमर्स सारख्या सेवा ओळखपत्राचा पुरावा न दाखवता मिळू शकेल.

ज्यांना ओटीपी किंवा कागदपत्रे हाताळण्यात अडचण येते अशा वृद्ध आणि निरक्षर लोकांसाठी ही सर्वात सोपी पद्धत असेल. आता फक्त फेस स्कॅनद्वारे सेवा मिळू शकतात.आता प्रवास, हॉटेल बुकिंग, आरोग्यसेवा आणि बँकिंग यासारख्या सेवांचा लाभ घेण्यासाठी ओळखपत्राची आवश्यकता नाही. फक्त कॅमेऱ्यासमोर तुमचा चेहरा दाखवल्याने, प्रमाणीकरण पूर्ण होईल आणि सेवा त्वरित उपलब्ध होईल.