
फ्लॅट मालकाने फ्लॅट भाडय़ाने दिला असल्यास सोसायटीकडून जे अतिरिक्त शुल्क आकारले जाते, त्याला (नॉन-ऑक्युपन्सी चार्जेस) बिगर भोगवटा शुल्क म्हणतात.
फ्लॅट इतर व्यक्तीला भाडय़ाने किंवा लीव्ह आणि लायसन्सवर दिल्यास नॉन-ऑक्युपन्सी शुल्क आकारले जाते. हे नियमित देखभाल शुल्कापेक्षा वेगळे असते.
राज्यात NOC शुल्क मेंटेनन्स बिलमधील सेवा शुल्काच्या जास्तीत जास्त 10 टक्के इतकेच आकारले जाऊ शकते. जवळचे नातेवाईक राहत असल्यास हे शुल्क आकारले जात नाही.
अनेक सोसायटय़ा ठरवून दिलेली मोठी रक्कम बेकायदेशीरपणे वसूल करतात, ज्याविरोधात सहकार उपनिबंधकांकडे (Registrar) दाद मागता येते.
तसेच ठराव बेकायदा ठरवून घेण्यासाठी सहकार न्यायालयात दाद मागावी लागेल. विकास निधी पिंवा अन्य कोणत्याही शीर्षकाखाली संस्थेस जादा शुल्क स्वीकारता येत नाही.
























































