
गुगलकडून 15 जीबीपर्यंत साठवण क्षमता मोफत मिळते. ती आजकाल अपुरी पडत आहे. अनावश्यक ईमेल न गमावता गुगल स्टोरेज रिकामे करता येते.
गुगलच्या स्टोरेज मॅनेजरमध्ये जा. तिथे ‘फ्री अप अकाउंट स्टोरेज’ यावर क्लिक करा. त्यानंतर लार्ज अटॅचमेंटचा पर्याय निवडून मोठय़ा फाईल्स असलेले अनावश्यक ईमेल डिलीट करा.
अजून एक पर्याय म्हणजे, older_than:2y असे जीमेलच्या सर्चमध्ये टाका. येथे 3, 4, 5… असे आकडे बदलून तेवढे वर्ष जुने ईमेल दिसतील. अनावश्यक ईमेल डिलीट करा.
गुगल पह्टो आणि गुगल ड्राईव्हमध्येदेखील तुमचा डेटा स्टोअर असतो. तेथून अनावश्यक पह्टो, व्हिडीओ किंवा इतर मोठय़ा फाईल्स डिलीट करा.
अजून एक पर्याय म्हणजे, नवे जीमेल खाते तयार करा. तेथे सर्व ईमेल्सचा बॅकअप घ्या आणि तो नव्या खात्यात डेटा ट्रान्सफर करा.

























































