जादूटोण्याने प्रश्न सुटले असते तर युद्ध लिंबू-मिरचीने लढलो असतो आणि निवडणुका एका जागी बसून जिंकलो असतो, विधिमंडळात फडणवीसांचे निवेदन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जादूटोणा करून प्रश्न सुटले असले तर आपण युद्ध ड्रोनऐवजी लिंबूमिरचीने लढलो असतो. पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना आपण इथे बसून टाचणी टोचून संपवले असते. जादूटोण्याने समस्या संपल्या असत्या तर भोंदू खरातला ट्रम्पने सुरक्षा सल्लागार नेमले असते. इतपंच कशाला प्रचारसभा न घेता निवडणुका एका जागी बसून जिंकलो असतो, अशी तुफान टोलेबाजी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.

खरात प्रकरणी ज्यांच्याकडे माहिती असेल ती त्यांनी सरकारकडे द्यावी, असे आवाहन करताना खरातची पाळेमुळे खणून काढू, असा पुनरुच्चार केला. फडणवीस यांनी भोंदू खरातबाबाच्या प्रकरणाचे वर्णन अंधश्रद्धेत हरवलेला विवेक अशा शब्दात केले.

सुरस आणि चमत्कारिक कथा

मुळात खरात पॅप्टन नाही हे आता उघडकीस आले आहे. मी मंगळवारी याबाबत निवेदन केले असून त्यानंतरही खूप माहिती समोर येत आहे. त्याची मालमत्ता, वेगवेगळे कांड उघडकीस येत आहेत. खरातची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्याच्या सुरस आणि चमत्कारिक कथा समोर येत राहतील, असे ते म्हणाले.

डझनभर मंत्री, दोन डझन अधिकारी तुरुंगात जातील!

मित्रपक्षातील सहकाऱयांनी फडणवीसांचे मुख्यमंत्रीपद घालवण्यासाठी खरातकडून अघोरी पूजा केल्यानेच भोंदूबाबा अशोक खरातविरोधात आता कारवाई सुरू आहे. खरात प्रकरणात सरकारने प्रामाणिकपणे कारवाई केली तर डझनभर मंत्री आणि दोन डझन अधिकारी जेलमध्ये जातील, असा दावा काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांचेही या भोंदू खरातशी अत्यंत जवळचे संबंध होते. त्यांनीही मुख्यमंत्री होण्यासाठी या बाबाकडून अघोरी पूजा केल्याची माहिती मिळत असल्याचे सपकाळ म्हणाले.

38 आमदारांनी करंगळय़ा कापून अघोरी पूजा केली!

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर आरोप केले. फडणवीसांना मुख्यमंत्रीपदावरून घालवण्यासाठी खरातकडून काही मंत्र्यांनी अघोरी पूजा करून घेतली. आमदारांनी करंगळ्या कापल्या. करंगळ्या कापणाऱया या 38 आमदारांची यादी उपलब्ध असल्याचा दावा आव्हाड यांनी केला. एपस्टीन कोठडीत मेला. अशोक खरातला कायमस्वरूपी सीसीटीव्ही पॅमेऱयाच्या कक्षेत ठेवा. तो जिवंत राहील याची व्यवस्था करा. कारण त्याला गेल्या 20 वर्षांपासूनची महाराष्ट्राच्या राजकारणाची इत्थंभूत माहिती आहे, असे आव्हाड म्हणाले.