
ओरॅकल कंपनीने जगभरात 30 हजार तर हिंदुस्थानातून 12 हजार कर्मचाऱ्यांना तडकाफडकी कामावरून काढल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. कर्मचाऱ्यांची नोकरी जाण्यामागे एआय असल्याचे सांगितले जात आहे. याचदरम्यान परप्लेक्सिटीचे सीईओ अरविंद श्रीनिवास यांनी एक अजब सल्ला दिला आहे.
अरविंद श्रीनिवास यांनी नुकत्या एका पॉडकास्टमध्ये म्हटले की, कर्मचाऱ्यांची एआयमुळे नोकरी गेली असेल तर नोकरी गमवणाऱ्यांनी बिझनेस सुरू करावा. नोकरी गेल्यानंतर याकडे एक संधी म्हणून पाहावे, त्यांनी स्वतःचा बिझनेस सुरू करावा असे म्हटले आहे, परंतु त्यांच्या या विधानावर आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. सीईओ यांच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका केली जात आहे. नेटकऱ्यांनी म्हटले की, स्वतःचा बिझनेस सुरू करणे सोपे नाही.






























































