हिवाळ्यात ओठ फुटलेत, करुन बघा हे साधे सोपे घरगुती उपाय

हिवाळ्यात थंड व कोरड्या हवामानामुळे ओठ फुटण्याची समस्या अनेकांना भेडसावते. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये ओठ फुटल्यावर बाहेरील कोणतीही क्रिम वापरण्यापेक्षा आपण विविध नैसर्गिक उपाय घरबसल्या करु शकतो. हिवाळ्यामध्ये ओठ नैसर्गिक तेलग्रंथी नसल्याने ते लवकर कोरडे पडतात. अशा वेळी काही सोपे घरगुती उपाय उपयोगी ठरू शकतात.

तूप किंवा नारळ तेल – रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर थोडे तूप किंवा नारळ तेल लावा. यामुळे ओठांना पोषण मिळते आणि कोरडेपणा कमी होतो.

जेवल्यानंतर एक वाटी ताक पिण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा

मध – मध हा नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. दिवसातून दोन वेळा ओठांवर मध लावल्यास ओठ मऊ राहतात आणि भेगा भरून येण्यास मदत होते.

गुलाबपाणी आणि ग्लिसरीन- गुलाबपाणी व ग्लिसरीन समान प्रमाणात मिसळून ओठांवर लावा. हा उपाय ओठांना ओलावा देतो आणि काळेपणही कमी करतो.

साखरेचा स्क्रब – थोडी साखर आणि मध मिसळून हलक्या हाताने ओठांवर चोळा. यामुळे मृत त्वचा निघून जाते. आठवड्यातून १–२ वेळाच हा उपाय करा.

आहारात वेलचीचा समावेश करण्याचे फायदे जाणून तुम्हीही थक्क व्हाल, वाचा

दूध किंवा साजूक तूप – कच्च्या दुधात कापूस भिजवून ओठांवर लावा किंवा थोडे साजूक तूप लावा. यामुळे ओठांची त्वचा पोसली जाते.

भरपूर पाणी प्या- शरीरातील पाण्याची कमतरता ओठ फुटण्याचे मुख्य कारण असते. त्यामुळे हिवाळ्यातही पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे.

ओठ नैसर्गिकरित्या गुलाबी, मऊ आणि निरोगी राहण्यासाठी रोजच्या सवयी आणि योग्य काळजी खूप महत्त्वाची असते. खाली दिलेले उपाय नियमित केल्यास ओठांचा रंग टिकून राहण्यास मदत होते.

ताटातील हा आंबट पदार्थ आपल्या आरोग्यासाठी आहे खूप महत्त्वाचा, जाणून घ्या

नियमित मॉइश्चरायझिंग करा- दिवसातून २–३ वेळा ओठांवर तूप, नारळ तेल, बदाम तेल किंवा लिप बाम लावा. यामुळे ओठ कोरडे पडत नाहीत आणि नैसर्गिक गुलाबीपणा टिकतो.

ओठांवर जीभ फिरवू नका- ओठ ओले करण्यासाठी जीभ फिरवण्याची सवय असल्यास ती टाळा. यामुळे ओठ अधिक कोरडे व काळपट होतात.

साखर–मध स्क्रब- आठवड्यातून १–२ वेळा साखर आणि मध मिसळून हलक्या हाताने ओठांवर स्क्रब करा. यामुळे मृत त्वचा निघून जाते आणि ओठांचा नैसर्गिक रंग खुलतो.

मध आणि लिंबू (मर्यादित वापर) – मधात थेंबभर लिंबाचा रस मिसळून रात्री ओठांवर लावा. आठवड्यातून २ वेळाच हा उपाय करा, कारण लिंबू जास्त वापरल्यास ओठ कोरडे पडू शकतात.

चेहऱ्यावरील ब्लॅकहेडस् काढण्यासाठी वापरा ही साधी सोपी पद्धत, वाचा