
आपण नवीन चप्पलांची खरेदी करतो, पण जर कुठे स्क्रॅच किंवा डाग पडला, तर त्यांची चमक लगेचच कमी होते. मग त्या कितीही महागडया असल्या, एकदा खराब वाटू लागतात. यावर काही घरगुती उपाय करून चपलांना पुन्हा नव्यासारखे रुप देऊ शकतो.
लेदर, पेटंट लेदर, सिंथेटिक लेदर किंवा रबरच्या चप्पलांवर स्क्रॅचेस किंवा डाग पडले असतील, तर एक जुना टूथब्रश घ्या, त्यावर थोडी टूथपेस्ट लावा आणि स्क्रॅच असलेल्या भागावर गोलाकार रगडा. काही वेळाने एक थोडा ओलसर कपडा घेऊन तो भाग स्वच्छ करा आणि चप्पल सुकण्यासाठी ठेवा. नेल पॉलिश रिमूव्हर, बेकिंग सोडा यांचाही वापर करता येईल. स्वेडच्या चप्पलांवर हलके व्रॅचेस असतील, तर पेंसिल इरेजर हा एक उत्तम उपाय आहे.