आयआयटी हैदराबादेत धावतेय विनाड्रायव्हर बस

इंडियन इन्स्टिटय़ुट ऑफ टेक्नोलॉजी (आयआयटी) हैदराबादने आपल्या कॅम्पसमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) ने चालणारी विनाचालक बस सेवा सुरू केली आहे. या बसला टेक्नोलॉजी इनोव्हेशन हब ऑन ऑटोनोमस नेव्हिगेशनने तयार केले आहे. ही सेवा सध्या केवळ पॅम्पसमध्ये चालवली जात आहे. टीमच्या प्राध्यापक पी. राजलक्ष्मी यांच्या नेतृत्वाखाली या सेल्फ ड्रायव्हिंग इलेक्ट्रिक शटलला यशस्वीपणे डिझाईन करण्यात आले आहे. आतापर्यंत या बसमधून दहा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवास केला आहे. या बसेस दोन प्रकारच्या आहेत, यात एक 6 सीटर आणि दुसरी 14 सीटरची आहे. या बसमध्ये ऑटोमेटिक इमर्जन्सी ब्रेक आणि अॅडेप्टिव्ह क्रूझ पंट्रोल यासारखे फीचर दिले आहेत. या फीचरमुळे रस्त्यात येणाऱ्या अडचणी, पायी चालणारे पादचारी आणि अन्य गाडय़ांपासून सुरक्षित अंतर ठेवून सोयीनुसार वेग बदलण्यात मदत मिळते. या बसची सध्या संपूर्ण शहरात चर्चा सुरू आहे.आयआयटी हैदराबादशिवाय टीआयएचएएनचे काम हिंदुस्थानच्या ट्रान्सपर्ह्ट सेक्टरमध्ये बदल घडवू शकतो. या हबने देशातील पहिले ऑटोमॅटिक ड्रायव्हिंग टेस्ट सेंटर बनवले आहे.