
आयआयटी विद्यार्थी नमन अग्रवाल आत्महत्या प्रकरणी पवई पोलिसांनी त्याचे काका आणि दोन रूममेटचे जबाब नोंदवले. मूळचा राजस्थानचा असलेला नमन हा आयआयटीमध्ये शिकत होता. त्याने आयआयटी कॅम्पसमधील इमारत क्रमांक 4 येथील छतावरून उडी मारून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येप्रकरणी पवई पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. घटनास्थळी पोलिसांना एक सुसाईड नोट मिळाली आहे. अपमृत्यूची नोंद करून पवई पोलिसांनी त्याचे काका आणि दोन रूममेटचे जबाब नोंद केले. नमन हा आत्महत्येपूर्वी निराश होता. त्याची प्रकृतीदेखील ठीक नव्हती. नमनचे वडील आजारी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस नमनच्या बहिणीचादेखील जबाब नोंदवणार आहेत.





























































