धर्मेंद्र यांच्या शेवटच्या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित, चाहते भावूक

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालं आहे. धर्मेंद्र यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत झाला आहे. धर्मेंद्र यांच्या निधनाने चित्रपट सृष्टीत शोककळा पसरली आहे. धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारासाठी बॉलिवूड सेलिब्रिटी दाखल झाले आहेत. तर अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. धर्मेंद्र यांची हिंदी चित्रपटसृष्टीतील कारकीर्द नेहमी संस्मरणीय राहील.

धर्मेंद्र यांनी 300 पेक्षा अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आज एका दिग्गज अभिनेत्याने जरी जगाचा निरोप घेतला असला तरी त्यांचे चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. धर्मेंद्र यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत झाला असला तरी त्यांचा एक शेवटचा चित्रपट रिलीज होणं बाकी आहे. त्यामुळे त्यांच्या या शेवटच्या चित्रपटातून पुन्हा आपल्याला त्यांना मोठ्या पडद्यावर बघण्याची संधी मिळणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Maddock Films (@maddockfilms)

दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांचा ‘इक्कीस’ हा चित्रपट 25 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्या नंदा मुख्य भूमिकेमध्ये असणार आहे. धर्मेंद्र या चित्रपटामध्ये वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत. नुकतंच या चित्रपटाचं एक पोस्टर देखील समोर आलं आहे.

पंजाबमधून आलेला तरुण कसा झाला बाॅलीवूडचा हीमॅन, वाचा