
‘घायल हूँ इसलिए घातक हूँ…’ हा ‘धुरंधर’ सिनेमातील डायलॉग मारत आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांनी आज स्वपक्षातील नेत्यांना धमकीच दिली. ‘पक्षाच्या नेत्यांकडून होणारे सर्व आरोप त्यांनी फेटाळून लावले. ‘माझ्याविरोधात सुनियोजित मोहीम चालवली जात आहे. माझ्यावरील कुठल्याही आरोपात तथ्य नाही. यापुढे प्रत्येक आरोपाला चोख उत्तर देणार, असेही त्यांनी ठणकावले.


























































