
शिवसेनाच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख आणि मुंबई नगरसेवकांची बैठक आज शिवसेना भवन येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. संघटना बांधणीच्या दृष्टीने यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते दिवाकर रावते, शिवसेना नेते सचिव विनायक राऊत, शिवसेना नेते अंबादास दानवे, शिवसेना नेते आमदार ॲड. अनिल परब, उपनेते रविंद्र मिर्लेकर, उपनेते अरविंद नेरकर, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, शिवसेना सचिव सुरज चव्हाण, शिवसेना सचिव स्विकृत नगरसेवक साईनाथ दुर्गे, शिवसेना सचिव सुधीर साळवी उपस्थित होते.

































































