जगभरातून महत्वाच्या बातम्या

रोबोट मदतीने टेलिसर्जरी यशस्वी

दिल्लीतील रुग्णालयात एका रुग्णावर गुरुग्राममधून डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली. रोहिणीतील राजीव गांधी कॅन्सर इन्स्टिटय़ूट अँड रिसर्च सेंटरच्या डॉक्टरांच्या पथकाने पहिल्यांदाच स्वदेशी सर्जिकल रोबोट ‘मंत्र’ची मदत घेतली. पहिल्यांदाच यशस्वीरीत्या टेलिसर्जरी करण्यात आली. ही शस्त्रक्रिया करण्यासाठी फायबर ऑप्टिक केबलने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली.

निखिल गुप्ता अमेरिकेच्या ताब्यात

गेल्या वर्षी अमेरिकेत गुरपतवंत सिंग पन्नू नावाच्या एका खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी निखिल गुप्ता यांना अटक झाली होती. गुप्ता यांचे 14 जून रोजी चेक प्रजासत्ताककडून अमेरिकेकडे प्रत्यार्पण करण्यात आले. याचा व्हिडीओ त्यांच्या पोलिसांकडून जारी करण्यात आला आहे. 17 जून रोजी त्याला अमेरिकेच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

सेन्सेक्सची ऐतिहासिक उसळी

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने आज ऐतिहासिक उसळी घेतली. निर्देशांक तब्बल 334 अंकांनी म्हणजेच 0.43 टक्क्यांच्या वाढीसह 77,326.98 वर पोहोचला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 95 अंकांच्या म्हणजेच 0.41 टक्क्यांच्या वाढीसह 23,560.70 वर बंद झाला. पावर ग्रीड, विप्रो, आयसीआयसीआय बँक, टायटन कंपनी, एम ऍण्ड एम, ऑक्सिस बँकेचे शेअर्स वधारले.

इस्रोचा नवा उपग्रह घेणार अंतराळ भरारी

हिंदुस्थानची अंतराळ संस्था इस्रोचा नवा उपग्रह GSAT-N2 अंतराळात भरारी घेण्यासाठी सज्ज झाला आहे. हा नवीन कम्युनिकेशन उपग्रह देशभरातील ब्रॉण्डबॅण्ड कनेक्टिव्हिटी आणि इन फ्लाईट कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यासाठी मदत करणार आहे. हा उपग्रह अमेरिकेतील स्पेसएक्स कंपनीच्या फाल्कन-9 रॉकेटद्वारे प्रक्षेपित केला जाईल. हे प्रक्षेपण एक ते दोन महिन्यांत होईल.

अमरावतीत एअर इंडियाचे पायलट ट्रेनिंग स्कूल

एअर इंडियाने अमरावती येथे पायलट ट्रेनिंग सुरू करण्याची योजना आखली आहे. देशातील वैमानिकांची कमतरता दूर करण्यासाठी हे ट्रेनिंग सुरू केले आहे. दरवर्षी 180 वैमानिकांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्टय़ असेल. हिंदुस्थानसह जागतिक स्तरावर प्रशिक्षित वैमानिकांची मागणी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले असून अनुभवी वैमानिकांद्वारे प्रशिक्षण दिले जाईल.

पुतीन उत्तर कोरिया दौऱ्यावर; अमेरिका गॅसवर

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे 24 वर्षांत पहिल्यांदाच उत्तर कोरियाला भेट देणार आहेत. त्यामुळे अमेरिका प्रचंड चिंताग्रस्त झाली आहे. उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांगमध्ये उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन आणि पुतीन यांची भेट होणार असून दोन्ही नेते सुरक्षा, व्यापार यांच्यासह विविध मुद्दय़ांवर चर्चा करणार आहेत.

पुतीन आणि किम जोंग उन या दोन्ही नेत्यांची शेवटची भेट सप्टेंबरमध्ये रशियाच्या वॉस्तोश्री कॉस्मोड्रोम या शहरात झाली होती, मात्र आता 2000 सालानंतर पुतीन पहिल्यांदाच प्योंगयांगला भेट देणार आहेत. ही भेट प्रामुख्याने सुरक्षा मुद्दय़ांबाबत असणार आहे. यावेळी पुतीन उत्तर कोरियातील एकमेव ऑर्थोडॉक्स चर्च, लाईफ-गिविंग ट्रिनिटीला भेट देणार आहेत.

‘पुष्पा 2’ चे प्रदर्शन लांबणीवर

अल्लू अर्जुन याच्या बहुप्रतीक्षित ‘पुष्पा 2’ या चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर गेले असून निर्मात्यांनी प्रदर्शनाची नवीन तारीख जाहीर केली. त्यामुळे चाहत्यांची निराशा झाली आहे. सुरुवातीला 15 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता, आता निर्मात्यांनी नवीन पोस्टर शेयर करत आता ‘पुष्पा 2’ हा चित्रपट 6 डिसेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिली. गुणवत्तेशी तडजोड करायची नाही, म्हणून प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला, असे निर्मात्यांनी स्पष्ट केले.

प्रदर्शनापूर्वी ‘कल्की’चा ऑस्ट्रेलियात धुमाकूळ

अश्विन नाग यांच्या ‘कल्की 2898 एडी’ या मायथोलॉजिकल साय-फाय चित्रपटाने प्रदर्शनापूर्वी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. ऑस्ट्रेलियात या चित्रपटाला चांगली ऍडवान्स बुकिंग मिळाली असून पहिल्या दिवसाच्या शोची तब्बल 5 हजार तिकिटे विकली गेली आहेत. म्हणजेच ऑस्ट्रेलियात या बहुचर्चित चित्रपटाने 83 लाख रुपयांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियात हा चित्रपट चार भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून तेलगु व्हर्जनची 4779 तर हिंदी व्हर्जनची 216 तिकीटे विकली गेली आहेत.

गुंतवणुकीच्या सल्ल्यांवर विश्वास ठेवू नका 

अनेकजण इन्स्टाग्राम, टेलिग्राम ग्रुपकर मिळणाऱया गुंतकणुकीच्या सल्ल्याकर किश्वास ठेकतात आणि चुकीच्या क्यक्तीकडून मिळालेल्या सल्ल्यामुळे अनेकांचे हजारो रुपयांचे नुकसान होते. मात्र, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामकरील गुंतकणुकीच्या सल्ल्यांकर किश्वास ठेकू नका, असे राष्ट्रीय शेअर बाजाराने (एनएसई) सांगितले आहे. इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामकर असे अनेक ग्रुप आहेत, जे गुंतकणुकीचा सल्ला देतात. तसेच अमूक कंपनीत गुंतकणूक केल्यामुळे अमूक फायदा झाला, असा दाका या ग्रुपकर केला जातो.

जिओचे इंटरनेट बंद

देशभरात रिलायन्स जिओची इंटरनेट सेवा खंडित झाली. जिओ फायबरची सेवा वापरणाऱयांनाही इंटरनेट डाऊनचा सामना करावा लागला. वर्क फ्रॉम होम करणाऱया कर्मचाऱयांनी याप्रकरणी संताप व्यक्त केला. इंटरनेट डाऊनमुळे व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, एक्स, स्नॅपचॅट, यूटय़ूब आणि गुगल वापरताना अनेक अडचणी येत होत्या. 52 टक्क्यांहून अधिक तक्रारदारांना मोबाईल इंटरनेट, 38 टक्के जिओ फायबर आणि 7 टक्के मोबाईल नेटवर्कमध्ये व्यत्यय आला. त्यामुळे अनेक ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हिंदुजांचा नोकरांपेक्षा कुत्र्यावर अधिक खर्च 

कर्मचाऱयांची तस्करी आणि शोषण करण्याचा आरोप असलेल्या ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत कुटुंब हिंदुजा यांनी त्यांच्या नोकरांपेक्षा अधिक त्यांच्या पाळीवर कुत्र्यावर पैसे खर्च केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. त्यांच्याकडे काम करणाऱया एका महिलेला सात दिवस रोज 18 तास काम राबवून घेतले जायचे, परंतु तुटपुंजा पगार दिला जायचा, असे फिर्यादी यवेस बर्टोसा यांच्या वतीने वकीलांनी न्यायालयात सांगितले. नोकरांचे पासपोर्टही जप्त करण्यात आले होते, असेही त्यांनी सांगितले.