
इस्रायलने केलेल्या हल्ल्यात येमेनमधील हुती बंडखोरांच्या सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहावी यांचा मृत्यू झाला आहे, तर अन्य काही मंत्रीही मारले गेले आहेत. बंडखोरांच्या हुती सरकारनेही यास दुजोरा दिला आहे.
येमेनची राजधानी साना येथील हुती बंडखोरांच्या लष्करी तळांवर इस्रायलने शनिवारी बॉम्बहल्ला केला. या हल्ल्यात हुतीचे अर्धे मंत्रिमंडळ मारले गेले. ‘दगाबाज इस्रायलच्या गुन्हेगारी हल्ल्यात आमचे लढवय्ये नेते अहमद गालिब नासिर अल राहावी शहीद झाले आहेत, असे हुती सरकारने अधिकृत निवेदनात म्हटले आहे.






























































