
जगभरात स्मार्टफोनच्या आहारी लोक जात आहेत. 24 तासांपैकी 8 ते 10 तासांहून अधिक वेळा फोनचा वापर केला जात आहे. त्यामुळे जपानच्या तोयोआके शहरात आता जास्त स्मार्टफोन वापरण्यास बंदी घातली आहे. केवळ दोन तास स्मार्टफोन वापरता येईल. तोयोआके शहराच्या महापौर यांनी घोषणा केलीय की, यासंबंधीचा प्रस्ताव विधानसभेत आणला जाईल. शाळा आणि सरकारी कामकाजासाठी याला सूट दिली जाईल.