गणपती बाप्पा मोरया… पण 13 पुलांवरून सांभाळून जा!

सर्वांचा लाडका गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आल्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या महाकाय मूर्ती मंडपाकडे रवाना होत आहेत. बाप्पाची मूर्ती नेताना मोठय़ा प्रमाणात गर्दी होत असून वाजतगाजत मिरवणुका काढण्यात येत आहेत. मात्र गणेश आगमन मार्गावरील तब्बल 13 पूल धोकादायक असल्याने या पुलावरून जाताना काळजी घ्यावी, जास्त वेळ थांबू नये, असा इशारा पालिकेच्या पूल विभागाकडून देण्यात आला आहे. धोकादायक पुलांवर शक्यतो 16 टनांपेक्षा अधिक वजन होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

अंधेरीत 3 जुलै 2018 रोजी गोखले पूल कोसळून दोन जणांचा आणि 14 मार्च 2019 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील ‘हिमालय’ पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा बळी गेल्यानंतर मुंबईतील पुलांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यामुळे पालिकेने मुंबईतील सर्व पुलांचे नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती आणि काही पूल पाडून नव्याने तर नागरिकांच्या मागणीनुसार काही पूल नवीन बांधण्यात येत आहेत. अतिधोकादायक पूल पाडून नव्याने बांधण्याचे धोरण आखले आहे, मात्र काही जुन्या पुलांचा वापर अजूनही केला जात आहे. त्यामुळे गणेशोत्सवात या पुलांचा वापर करताना खबरदारी बाळगावी, यासाठी पालिकेने यादी जाहीर केली आहे.

या पुलांवरून जाताना सावधान

z महालक्ष्मी स्टील रेल्वे ओव्हर ब्रिज

z प्रभादेवी-कॅरोल रेल ओव्हर ब्रिज

z दादर-टिळक रेल्वे ओव्हर ब्रिज

z करी रोड रेल्वे ओव्हर ब्रिज

z सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे ओव्हर ब्रिज

z फ्रेंच रेल ओव्हर ब्रिज (ग्रॅण्ट रोड व चर्नी रोडच्या मध्ये)

z मरीन लाईन्स रेल्वे ओव्हर ब्रिज

z केनेडी रेल्वे पूल (ग्रॅण्ट रोड व चर्नी रोडच्या मध्ये)

z फॉकलंड रेल्वे ओव्हर ब्रिज (ग्रॅण्ट रोड व मुंबई सेंट्रलदरम्यान)

z बेलासीस मुंबई सेंट्रलजवळील ब्रिज

z घाटकोपर रेल्वे ओव्हर ब्रिज