टोमणे आणि तिरकसपणा पाट्यांसाठी प्रसिद्ध असलेले पुणे शहर महापालिका प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे खड्ड्यात गेले आहे. ‘स्मार्ट सिटी’ अशी वाटचाल करण्याचा दावा करणाऱ्या पुण्यातील रस्त्यांची अवस्था चंद्रावरील खड्ड्यांसारखीच झाली आहे. कशाचीही खिल्ली उडविण्यात पटाईत असलेल्या पुणेकरांनी आता खड्ड्यांसाठी चक्क प्रसिद्ध दिवंगत मराठी अभिनेते अरुण सरनाईक यांच्या ‘चंदनाची चोळी अंग अंग जाळी’ या चित्रपटातील ‘एक लाजरा न साजरा मुखडा चंद्रावाणी फुलला गं’, या गाण्याचा आधार घेऊन विडंबनात्मक गाणे तयार केले आहे. ते सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
पुणेरी पाट्यांचा लौकीक जगभर पसरला आहे. आता या पाट्यांबरोबरच पुण्याचे खड्डेही सर्वत्र प्रसिद्ध झाले आहेत. खड्ड्यात वृक्षारोपण करून आंदोलन हा निषेधाचा नेहमीचाच प्रकार ! मात्र आता सोशल मीडियावर वेगवेगळ्या मीम्स टाकून या खड्यांवरून प्रशासनाला ट्रोल केले जात आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत भाजप सत्तेवर आला. मात्र, काही ना काही कारणांनी रस्ते खोदून संपूर्ण पुण्याची अक्षरशः वाट लावली. या खड्ड्यांमुळे अनेक लहान-मोठे अपघात रोज होत असून, सर्वच रस्ते मृत्यूचे सापळे बनले आहेत. कात्रज-कोंढवा रस्त्यावरील खडी मशीन चौकात रस्त्याचे काम सुरू असलेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात कपडे धुण्यासाठी गेलेल्या चार मुलींना जीव गमवावा लागला. गेल्या वर्षी जून महिन्यात ही घटना घडली होती.
सोशल मीडियावर तर रोजच खड्ड्यांवरून वेगवेगळ्या गमतीशीर पोस्ट टाकण्यात येत आहेत. शोलेतील ‘जय वीरूं’ नाही पुणेकरांनी पुण्यातील रस्त्यावर उतरवले होते. जखमी अवस्थेत असलेल्या जयला वीरूचा प्रश्न ‘कैसे हुआ?’ आणि त्यावर जयच उत्तर ‘कोथरूड से खराडी गया था, बाय रोड’, ही पोस्टही लक्षवेधी ठरत आहे.
एक आडवा न तिडवा खड्डा चंद्रावाणी पडला गं… मेला कॉन्ट्रॅक्टर हसतोय कसा की पुणेकर पडला गं… या आकांताचा तुला इशारा कळंला गं… खड्डा आडवा येतोय मला की पाय माझा मोडला गं… नको राणी नको रडू खड्यामध्ये नको पडू… इथून नको तिथून जाऊ रस्ता हा घावतोय का पाहू… का? पडत्यात